smbs.org.in

समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था

दिनांक १० ऑगस्ट २०२१ ते १० ऑगस्ट २०२२ पर्यंत वर्षभरामध्ये संस्थेने १६ ट्रेनिंग घेतले असून १६७६ सदस्यांना सक्षम बनविले आहे .तसेच संस्थेच्या संस्थापिका सौ. राजश्री ताई गागरे यांनी वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ३५०० ते ४००० महिलांना व्यवसायिक मार्गदर्शन केले आहे. 

    गेल्या १५ वर्षांमध्ये  ताईंनी २०९  जवळपास बचत गटांची स्थापना करून , महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले आहे. भविष्यातही महिलांना स्वतःच्या पायावर उभेकरुन सक्षम करून महिलांच्या व्यवसाय वाढविण्याकडे संस्थेचा कल राहील दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी एक वर्षासाठी संस्थेची १७ पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर झाली होती. 

      संस्थेच्या उपाध्यक्ष आणि इतर सदस्य नोंदणी असा जवळपास 1100  महिलांचा ग्रुप सध्या कार्यरत आहे.

संस्थेचा प्रवास कसा सुरु झाला?

आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागत असते. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सौ. राजश्री ताई गागरे गेल्या  15 वर्षापासून अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून बालसंस्कार युवा प्रबोधन असू द्या किंवा शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन  विद्यार्थ्यांना मराठी संस्कृती मराठी, अस्मिता तसेच,  विज्ञान अध्यात्मक याविषयी मार्गदर्शनासू द्या तसेच गरजू, काष्टकरी, गोरगरीब, तळागाळातील महिलांना बचत गट स्थापना, लघुउद्योग याविषयी व्यावसायिक मार्गदर्शन देत असून,
हे सगळं करत असताना या सर्व सामाजिक कार्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होणे गरजेचे होते . याच भावनेतून 10 ऑगस्ट 2018 रोजी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची रीत सर नोंदणी करून स्थापना झाली.आणि सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे या घोषवाक्यखाली संस्थेतील महिला सक्षमीकरणाचा आगळावेगळा A  टू  Z पॅटर्न या स्वरूपात कार्यरत आहे.

कोविडच्या काळात करोना सारख्या जागतिक महामारी कोरोनामुळे गेले दोन वर्ष संस्थेचे उपक्रम ऑनलाइन चालू होते. मग संस्थेच्या संस्थापिका सौ राजश्रीताई गागरे यांनी,  सामाजिक बांधिलकी जपत असताना.  कोरोना काळामध्ये  गरजू गरीब , समाजातील दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच मास्क वाटप केले .

संस्थेच्या उपाध्यक्ष आणि इतर सदस्य नोंदणी असा जवळपास १५००+ महिलांचा ग्रुप सध्या कार्यरत आहे.

प्रशिक्षकांविषयी

तसेच आपल्या  स्वतःचा वाढदिवस , मुलांचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवसाचा आणा ठाई खर्च टाळून . गोरगरीब , गरजू ,  वारकरी  संप्रदायाची विद्यार्थी, भटक्या विमुक्त जमाती अशा  लोकांसाठी अन्न आणि खाऊचे वाटप वेळोवेळी केलेले आहे. आज दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत  रीतसर १००० सदस्य नोंदणीचा टप्पा संस्थेने पार केलेला आहे.

   संस्थेमध्ये तळागाळातील गोरगरीब महिलांपासून , उच्चशिक्षित महिला सदस्यांचा सहभाग आहे.  संस्थेने A टू Z स्वरूपात महिला सक्षमीकरणाचा   आगळा वेगळा पॅटर्न राबवत असताना , अगदी घरकाम करणाऱ्या सदस्य तसेच , जेवणाची ऑर्डर ,शिवणकाम, केक बनवणे,  वास्तुशास्त्र, शैक्षणिक ,ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र,  डॉक्टर , वकील इंजिनिअर , वास्तुविशारत, घर सजावट अशा वेगवेगळ्या  व्यवसायातील सदस्य एकत्र केलेले  असून,  संस्थेच्या माध्यमातून या सर्व सदस्यांना ग्रुप अंतर्गत मालाची खरेदी-विक्री, बाजारपेठ मार्केटिंग या सर्व सुविधा संस्था देत आहे.

भविष्यातही महिलांना स्वतःच्या पायावर उभेकरुन सक्षम करून महिलांच्या व्यवसाय वाढविण्याकडे संस्थेचा कल राहील दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी एक वर्षासाठी संस्थेची १७ पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर झाली होती.