संस्थेमार्फत घेण्यात आलेले प्रशिक्षण !
कार्यक्रम महिती
तळागाळातील गरीब कष्टकरी महिलांसाठी बचत गट व गृह उद्योगाबद्दल मार्गदर्शन करणे
समाजातील उपेक्षित तसेच दुःखी पीडित नैराश्यग्रस्त लोकांसाठी अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातूनअध्यात्मिक मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे
समूहातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस, लग्न वाढदिवस, मुलांचे वाढदिवस शक्यतो अनाथासश्रम, वृद्धाश्रम, आणि गरजू लोकांमध्ये साजरे करून मदत करणे. (अनाठायी खर्च टाळून)
वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
रस्त्यावर फिरणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी सोहम ट्रस्टच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉक्टर फॉर बेगर्स डॉक्टर अभिजीत सोनवणे यांचा संस्थेतर्फे सत्कार करताना
समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी, तसेच व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजन करणे.
महिलांसाठी संस्थेतर्फे तीन दिवसीय दांडिया प्रशिक्षण.
समर्थ महिला बहु उद्देशीय संस्थे तर्फे पिं चिं महानगरपालिका अंतर्गत नागरवस्ती विकास योजना न बद्दल माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी समाजसेविका संतोषी चोरगे मॅडम आणि समूह संघटिका रेश्मा पाटील यांनी योगदान दिले.
संस्थेतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले
ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार विविध महामंडळ शक्य झाल्यास परदेशी व निधी यांचा योग्य करून महिलांना वरील सेवा उपलब्ध करून देणे प्रामुख्याने कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसाय तसेच कुठे उद्योग सुरू करणे
एस एम बी एस च्या सदस्यांना व्यवसाय वाढीसाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला.
कोरोना काळामध्ये रोजगार संधी गमावलेल्या दिव्यांग टेलर्सला हजार मास्क बनवण्याचे किट संस्थेतर्फे वाटप करताना.
दिव्यांग अपंग सहाय्य संघटनेच्या संस्थांसारख्या महिलांनाही सदस्य करून व्यावसायिक मार्गदर्शन संस्थेमार्फत दिले जाते
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा संस्थेतर्फे गुणगौरव सत्कार आणि पुरस्कार समारंभ घेण्यात येतो
पंढरपूर व आळंदी पाई वारी करणाऱ्या भाविकांसाठी संस्थेतर्फे फळवाटप व फराळ वाटप केले जाते
महिलांना स्वतःच्या व्यवसायासोबत राष्ट्रीय कर्तव्याची ही जाण असणे तितकाच सामाजिक बांधिलकीचा भाग असतो हे समजण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आगळे वेगळे सांस्कृतिक उपक्रम घेऊन मेट्रो सारख्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन अशा नवनवीन संकल्पना राबवून राष्ट्रीय कर्तव्य करून घेणे
एस एम बी एस च्या ध्येय उद्दिष्टानुसार सक्षमीकरणाच्या धोरणानुसार समाजामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान करण्यात येतो त्या अनुषंगाने पद्मश्री बीज माता राहीबाई पोपेरे यांचा संस्थापिका राजश्रीताई गागरे यांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन सत्कार सन्मान केला
संस्थेतर्फे सक्षम झालेल्या महिला सदस्य इतर सदस्यांसाठी सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असतात जसे की हर्बल सोप मेकिंग प्रशिक्षण.