महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या तयार मालाला अँप च्या स्वरूपात आजच्या डिजिटल जमान्यात बाजारपेठ उपलब्द्ध करून देणे .
महिलांच्या एकदंरीत व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळे क्लास्सेस ठेवणे. त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन करणे.
मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी, तसेच सर्व धर्मसमभाव हा संदेश देण्यासाठी वेगवेगळया सणांचे एकत्रित सादरीकरणात करणे.
परिसरातील प्रत्येक स्त्रीचा सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक व बौद्धिक विकास करणे.
शिक्षणा बरोबर मुलांचा आध्यात्मिक, आणि शारीरिक, सर्वांगीण विकसासाठी बालसंस्कार व युवाप्रोबोधन विनामूल्य संस्कार शिबिरे घेणे.
महिलांना एकमेकींची सुखदुःखे वाटून मानसिक आधार मिळावा यासाठी प्रयत्नशील असणे.
अचानक आलेल्या आपत्कालीन कौटुंबिक समस्येवर सर्वांनी मिळून आर्थिक, मानसिक आधार देणे.
विशिष्ट सणवार जसे मंगळागौर, गणपती, नवरात्र, हळदी कुंकू,एकत्रितपणे साजरी करून सामाजिक बांधिलकी जपून करमणूक करणे.
घर आणि व्यवसायाच्या व्यापातून थोडी सुटका , करमणूक म्हणून विविध सहलीचे नियोजन करणे.
विविध शासकीय, निमशाशकीय योजनांची महिलांपर्यंत माहिती देऊन प्रशिक्षण शिबिरे घेणे.
परिसरातील गरीब आणि गरजू मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करणे, शिष्यवृत्तीसाठी मदत करणे.
समूहातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस, लग्न वाढदिवस, मुलांचे वाढदिवस शक्यतो अनाथासश्रम, वृद्धाश्रम, आणि गरजू लोकांमध्ये साजरे करून मदत करणे. (अनाठायी खर्च टाळून)
महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी सह वेगवेगळ्या आरोग्य शिबरांचे आयोजन करणे, सुदृढ आरोग्याबद्दल तज्ज्ञ डॉ. चे मार्गदर्शन पर शिबीर ठेवणे.
वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी, तसेच व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजन करणे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे.
समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, थोतांड, तसेच कुटुंबातील मानसिक तणाव, नैराश्य, यासाठी समाजप्रबोधन करणे.
मुलांना विज्ञान आणि अध्यात्म समाजविणे.
महिलांना अन्याय, अत्याचार, बलात्कार यापासून सुरक्षित करण्यासाठी स्व- सुरक्षेचे (कराटे) प्रशिक्षण देणे. स्वसंरक्षण शिबीर आयोजन.
समाजात चांगला काम करणाऱ्या महिला तसेच सेवाभावी संस्था यांचा आदर करून त्यांना पुढील कामासाठी प्रेरणा देण्यासाठी महिला दिनचे औचित्य साधून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करणे.
ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध महामंडळे, स्वायत्त संस्था,शक्य झाल्यास परदेशी व निधी यांचा उपयोग करून महिलांना वरील सेवा, उपलब्ध करून देणे, प्रामुख्याने कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धविकास तसेच कुटीर उद्योग सुरु करणे.
या संदर्भात खादी व ग्रामोद्योग मंडळ याचा साहाय्याने विविध उपक्रम राबविणे यासोबत च वरिल बाबतीत आधुनिक तंत्रज्ञान राबविणे, प्रशिक्षण केंद्रे व मधुमक्षिका पालन केंद्रे सुरु करणे.